वार्ताहर/ हलगा
हलगा परिसरातील ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये 80 टक्के मतदान चुरशीने झाले. सर्वच मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी मतदार व उमेदवारांचे समर्थक मोठय़ा संख्येने दिसत होते. परिसरातील हलगा, बस्तवाड, तारिहाळ, मास्तमर्डी ग्रा. पं. कार्यक्षेत्रामध्ये हे मतदान झाले.
हलगा ग्रा. पं. कार्यक्षेत्रामध्ये हलगा गाव असून यामध्ये एकूण 5057 मतदान पैकी 4077 असे 80.62 टक्के मतदान झाले. यामध्ये 6 प्रभागमध्ये 18 सदस्यांसाठी ही निवडणूक झाली. प्रभाग क्र. 1 मध्ये 1157 पैकी 931 मतदान झाले. प्रभाक क्र. 2 मध्ये 970 पैकी 828, प्रभाग क्र. 3 मध्ये 697 पैकी 593, प्रभाग क्र. 4 मध्ये 630 पैकी 524, प्रभाक क्र. 5 मध्ये 981 पैकी 679 तर प्रभाग क्र. 6 मध्ये 642 पैकी 522 मतदान झाले.
तारिहाळ येथे 84.9 टक्के
तारिहाळ ग्रा. पं. क्षेत्रामध्ये तारिहाळ, चंदनहोसूर व कुलीकोप्प गावचा समावेश आहे. तारिहाळ येथील प्रभाग क्र. 1 मध्ये 530 पैकी 493, प्रभाग क्र. 2 मध्ये 648 पैकी 545, प्रभाग क्र. 3 मध्ये 787 पैकी 659, प्रभाग क्र. 4 मध्ये 1223 पैकी 984 मतदान झाले. चंदनहोसूर येथील प्रभाग क्र. 6 मध्ये 1082 पैकी 931 तर प्रभाग क्र. 7 मध्ये 706 पैकी 602 मतदान झाले. तर कुळीकोप्प येथील प्रभाग क्र. 5 मध्ये बसवराज फकिरा नाईक हे अविरोध निवड झाली आहे. तारिहाळ ग्रा. पं. क्षेत्रामध्ये 4976 पैकी 4214 असे 84.9 टक्के मतदान झाले आहे.
मास्तमर्डी ग्रा. पं. कार्यक्षेत्रामध्ये मास्तमर्डी, बसरीकट्टी, शरणमट्टी गावचा समावेश आहे. मास्तमर्डी गावामध्ये प्रभाग क्र. 1 मध्ये 1040 पैकी 919, प्रभाग क्र. 2 मध्ये 954 पैकी 854 मतदान झाले. तर बसरीकट्टी 4 मध्ये 1033 पैकी 938, प्रभाक क. 5 मध्ये 1092 पैकी 969 मतदान झाले.
बस्तवाडमध्ये चुरशीने मतदान
बस्तवाड ग्रा. पं. मध्ये बस्तवाड, कोंडसकोप्प खमकारहट्टी गावचा समावेश आहे. बस्तवाडमध्ये प्रभाग क्र. 1 मध्ये 1109 पैकी 996, प्रभाग क्र. 2 मध्ये 1106 पैकी 917, प्रभाग क्र. 3 मध्ये 1168 पैक 1000, तर प्रभाग क्र. 4 मध्ये 1557 पैकी 1294 मतदान जाले आहे. कोंडसकोप्पमध्ये प्रभाग क्र. 5 मध्ये 750 पैकी 671, प्रभाग क्र. 6 मध्ये 630 पैकी 529 मतदान झाले आहे. खमकारहट्टी येथील प्रभाग क्र. 7 मध्ये 719 पैकी 611 मतदान झाले आहे.
सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. कामगार वर्ग हा प्रामुख्याने मतदानाला सकाळी आला होता. सकाळी 10 नंतर महिलांनी व शेतकरी वर्गांनी मतदान केंद्रावर मोठय़ा प्रमाणात आल्याने एकच गर्दी झाली. सायंकाळी 4 नंतर मतदार कमी झाले होते. ही निवडणूक मोठय़ा चुरशीने झाल्याने उमेदवारांचे अनेक समर्थक मतदारांना आणत होते. वृद्ध व आजारी मतदारांना गाडीतून आणत होते. मतदान केंद्राजवळच गर्दी झाल्यामुळे येथून रहादीर करताना अडचणीचा सामना करावा लागत होता. तरुण पिढीही या निवडणुकीत सहभागी झाली होती. हलगा परिसरात निवडणूक मोठय़ा चुरशीने झाली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांनी हलगा गावामध्ये भेट दिली.