वार्ताहर/ हलगा
नवरात्रोत्सवात हलगा परिसरात दुर्गामाता दौड उत्साहात साजरी करण्यात आली. हलगा, बस्तवाड, मास्तमर्डी, तारिहाळ, खमकारहट्टी, कोंडसकोप्प, कोळीकोप्प या गावात दौड केवळ मोजक्याच धारकऱयांच्या उपस्थितीत काढण्यात आली. कोरोनामुळे प्रशासनाने अटी घातल्यामुळे अनेक शिवभक्तांना या दौडमध्ये भाग घेता आली नाही.
रविवार दि. 25 रोजी सकाळी 5.30 वाजता हलगा येथील शिवमूर्ती आवारात आश्वारूढ शिवमूर्तीचे पूजन जोतिबा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. भगवा ध्वज चढवून ध्वजाचे व शस्त्रांचे पूजन भैरु बिळगुचे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रेरणा मंत्र झाल्यानंतर दौड मार्गस्थ झाली. ही दौड गावातील प्रमुख मार्गावरून जात असताना सहभागी धारकऱयांनी छ. शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणांनी व अनेक देशभक्तीपर गीतांनी परिसर शिवमय झाला होता. अनेक महिलांनी आरती ओवाळून दौडचे स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील सर्व स्थळाचे देवस्थानचे पूजन करण्यात आले. मरगाई मंदिर येथे आरती करण्यात आली. ध्येयमंत्र झाल्यावर आकाश बाळेकुंद्री यांच्या हस्ते ध्वज उतरून दौडची सांगता करण्यात आली.