वार्ताहर / किणये
हलगा – मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात पुन्हा शेतकर्यांनी आंदोलन छेडले आहे. न्यायालयाने या रस्त्याला स्थगिती दिली असतानाही प्रशासनामार्फत दडपशाही मार्गाने पुन्हा मंगळवारी सकाळी रस्त्याचे कामकाज सुरू करण्याचे प्रयत्न चालू होते. प्रशासकीय अधिकारी
मोठा पोलिस फौजफाटा, जेसीबी घेऊन मंगळवारी सकाळी मच्छे शिवारात आले, संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बायपास रस्त्याला विरोध दर्शवून आलेल्या अधिकाऱ्यांना पळवून लावले. कोणत्याही परिस्थितीत या बायपास रस्त्याला आमची सुपीक जमीन देणार नाही असा ठाम इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
हवे तर आमच्या अंगावरून जेसीबी चढवा पण एक इंचही जमीन आम्ही या रस्त्यासाठी देणार नाही असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला . सुपीक जमिनीच प्रशासनाने हडप केली तर आम्ही शेतकर्याने जगायचे कसे असा सवालही इथल्या शेतकऱ्यांनी केला आहे.आमची सुपीक जमीन हिसकावून घेऊ नये व प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.