वार्ताहर /हलगा
हलगा येथील तलावाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी योजनेतून या तलावाचे नुकतेच सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते तलावाचे पूजन करून हा लोकार्पण कार्यक्रम करण्यात आला.
धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी अधिकारी रेणुका यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. परमपूज्य सिद्दसेन स्वामीजींच्या दिव्य सानिध्याखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवजीवन समिती अध्यक्ष जिन्नाप्पा धम्मणगी होते. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, खासदार मंगला अंगडी, चारुकिर्ती सैबन्नावर, ऍड. अण्णासाहेब घोरपडे, अशोक थोरली, जिन्नाप्पा धम्मणगी, धर्मस्थळचे अधिकारी दिग्गेगौडा, पार्श्वनाथ जैन बस्तीचे अध्यक्ष धनू देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते तलावाचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर, मंगला अंगडी, अण्णासाहेब घोरपडे, चारुकिर्ती सैबन्नावर, दिग्गेगौडा यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी धर्मस्थळच्या अधिकारी रेणुका यांनी आभार मानले. यावेळी गावातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते..