वादळी वारा-पावसाचा फटका; सुदैवाने जीवितहानी टळली : रविवारची संपूर्ण रात्र गाव अंधारात
वार्ताहर / किणये
रविवारी सायंकाळी वादळी वाऱयासह झालेल्या पावसामुळे हलगा येथील सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेले विद्युतखांब कोसळले. या परिसरात तीन खांब कोसळले असून सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, हॉटेलच्या दर्शनी भागावर खांब कोसळल्याने पत्र्यांचे नुकसान झाले आहे.
गेल्या महिनाभरापासून तालुक्मयात वळीव पावसाने धुमाकूळ घातला आहे. कडक उन्हाच्या वेळेत हा वळिवाचा पाऊस पडत असल्यामुळे नागरिक अक्षरशः वैतागून गेले आहेत. रविवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी पाचच्या दरम्यान तालुक्मयाच्या काही भागासह बस्तवाड-हलगा परिसरातही जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱयाच्या पावसामुळे खांब कोसळून पडण्याचे प्रकार घडले.
हलगा सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला असलेले तीन खांब कोसळले. या खांबांवरून विद्युतभारित ताराही जोडलेल्या होत्या. अचानक खांब कोसळल्यामुळे नागरिक भयभीत झाले. दुपारी 12 नंतर क्लोजडाऊन असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची व नागरिकांची वर्दळ नव्हती. यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. खांब कोसळल्यानंतर हलगा गावचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. रविवारची संपूर्ण रात्र हलगावासियांना अंधारातच काढावी लागली.
ऐन लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच विद्युतपुरवठा बंद होता. यामुळे टीव्हीवर बातम्या पाहणाऱयांची गैरसोय झाली. सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलच्या दर्शनी भागावर खांब कोसळला.
हॉटेलमध्ये केवळ पार्सल सिस्टीम सुरू होती. यामुळे दुर्घटना टळली. मात्र, हॉटेलच्या समोरील पत्रे खराब झाले. रविवारी सायंकाळपासूनच हलगा गावात वीजपुरवठा खंडित करण्यात आला. हेस्कॉमच्या अधिकाऱयांनी व कर्मचाऱयांनी शर्थीचे प्रयत्न करून सोमवारी दुपारनंतर वीजपुरवठा सुरळीत केला.
कमी खोलीवर खांब रोवल्याने दुर्घटना…
हलगा सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला असलेले विद्युतखांब कोसळल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. कारण या रस्त्यावरून वाहनधारकांची नेहमी मोठी वर्दळ असते. केवळ क्लोजडाऊनमुळे दुर्घटना टळली. हे विद्युतखांब अलीकडेच उभारले होते. खांब उभारताना जमिनीत अगदीच कमी खोलवर खांब रोवले जातात. यामुळे असे खांब पडण्याच्या घटना घडत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. हेस्कॉमच्या या कामकाजाबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.