प्रतिनिधी / बेळगाव
हलगा (ता. बेळगाव) येथे माय-लेकांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा कला.
भारती सुरेश घराणी (वय 36), मुलगा प्रज्वल (वय 15) अशी त्या दुर्दैवी माय-लेकांची नावे आहेत. या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही. भारती या हलगा येथे बेकरी चालवत होत्या. हिरेबागेवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.