शिवरायांना वंदन करून नववर्षाची सुरुवात
वार्ताहर/ हलगा
हलगा शिवप्रतिष्ठानतर्फे शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची विधिवत पूजा करून गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी वर्षारंभ होत असल्याने सर्व शिवभक्तांना शिवप्रतिष्ठानतर्फे शुभेच्छादेखील देण्यात आल्या. गुढी उभारून पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यात आला. यावेळी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रसाद धामणेकर, रोहित येळ्ळूर, कृष्णा कामाण्णाचे, मारुती कामाण्णाचे, प्रतीक हेब्बाजी, प्रशांत बिळगोजी यांच्यासह महिला व बालचमू उपस्थित होते.