इंडियन ऑईलची रिफायनरी – 40 जण जखमी
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्हय़ातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या हल्दिया रिफायनरीमध्ये आग लागल्याने 3 जणांचा मृत्यू झाला आहे. आग लागण्याची ही घटना मंगळवारी घडली आहे. या दुर्घटनेत 40 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून आग विझविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
जखमींपैकी 37 जणांना गंभीर अवस्थेत कोलकात्यात हलविण्यात आले आहे. यातील 7 जणांची प्रकृती अधिक गंभीर असल्याचे सांगण्यात आले. तर दुर्घटना घडलेले युनिट बंद होते. रिफायनरीत अचानक आग लागल्याने 44 लोक होरपळले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून स्थिती नियंत्रणात असल्याचे आयओसीकडून सांगण्यात आले.