ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नोएडाच्या गौतमबुद्ध नगर जिह्यात ‘हल्दीराम’ फूड फॅक्टरीत काल सकाळी झालेल्या अमोनिया गॅसच्या गळतीत एका कर्मचाऱयाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर आहेत.
याप्रकरणी हल्दीरामचे हल्दीरामचे मालक एमएल अग्रवाल आणि संचालक बलवीर सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताच्या भावाने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल सकाळी 11.30 च्या सुमारास हल्दीरामच्या फॅक्टरीमध्ये शनिवारी सकाळी अमोनिया गॅसची गळती झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कंपनीत सहाजण काम करत होते. गॅस गळतीमुळे चार जण बेशुद्ध झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी एका कर्मचाऱयाचा मृत्यू झाला.
कंपनीचे मालक आणि संचालकांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.