नंदगड : झारखंड राज्यातील रांची येथे होणाऱया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी भाग घेण्यासाठी कर्नाटक संघातून हल्याळ तालुक्मयातील 4 कुस्तीपटूंची निवड करण्यात आली.
गदग जिल्हा क्रीडांगणावर गत आठवडय़ात 15 वर्षाच्या आतील वयोगटातील कर्नाटक राज्य संघात निवड प्रक्रिया पूर्ण झाली. युवा सबलीकरण आणि क्रीडा खाते हल्याळ वसतिगृहातील खेळाडू प्रणिता सिद्धी (58 किलो), प्रतिक्षा भोवी (62 किलो), हल्याळ कुस्ती आखाडय़ातील प्रशिक्षण घेणाऱया मनीषा सिध्दी ( 66 किलो) व इरफान वालीकर (41 किलो) यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघातून निवड करण्यात आली. सदर राष्ट्रीय स्पर्धा दि. 15 ते 17 डिसेंबर या कालावधीत होईल.