उदय सावंत/वाळपई
सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा ठिकाणी यंदा आले व हळदीची आठ हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात येणार आहे .यासाठी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभत असून प्रत्येकी 40 शेतकरी यामध्ये भाग घेणार असून या संदर्भात पूर्वतयारी सुरू झालेली आहे. यामुळे येणाऱया वर्षात सत्तरी तालुक्मयामध्ये मोठय़ा प्रमाणात हळद व आल्याची उत्पादन होणार असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांनी दिली.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयामध्ये यंदा आले व हळदीची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्याचा उद्देश खात्याने निश्चित केलेला आहे. या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात प्रयत्न सुरू होते. त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभला असून सत्तरी तालुक्मयात वेगवेगळय़ा भागातील मोठय़ा प्रमाणात शेतकरी बांधवांनी या लागवडीसाठी इच्छा व्यक्त केलेली आहे. सध्यातरी जमीन तयार करून हळद लागवडीसाठी पूर्व तयारी सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आल्याची 4 हेक्टर क्षेत्रात लागवड होणार.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले कि सत्तरी तालुक्मयांमध्ये महिमा नावाची आल्याची जात विकसित होणार आहे. त्याच प्रमाणात स्थानिक पातळीवरील लागवडीवर भर देण्यात येणार आहे.यंदा चार हेक्?टर क्षेत्रामध्ये आल्याची लागवड होणार असून यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. सध्यातरी वाळपई विभागीय कृषी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचाऱयांचे पथक वेगवेगळय़ा ठिकाणी जाऊन शेतकऱयांना मार्गदर्शन करीत आहे. यामुळे या आल्याची लागवड यशस्वी व्हावी यासाठी सदर प्रकारचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा प्रथमच अशा प्रकारची लागवड करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी खात्याने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. गेल्या वषी काही प्रमाणात आल्याची लागवड करण्यात आली होती. सदर लागवड चांगल्या प्रकारे यशस्वी झाली. त्यामुळे यंदा मोठय़ा प्रमाणात आल्याची लागवड करून गोव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात आल्याचे उत्पादन करण्याच्या दृष्टिकोनातून सत्तरी तालुका महत्त्वाचे योगदान राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रतिभा, सेलम हळदीची लागवड होणार.
सत्तरी तालुक्मयांमध्ये गेल्या वषी चांगल्या प्रकारे हळदीची लागवड करण्यात आली होती. सदर लागवड अत्यंत यशस्वी ठरलेली आहे. त्यामुळे यंदा जवळपास चार.हेक्टर क्षेत्रात प्रतिभा व सेलम जातीची हळदीची लागवड मोठय़ा प्रमाणात करण्यात येणार आहे .यामध्ये जवळपास 40 शेतकरी बांधव भाग घेणार असून या संदर्भात पूर्वतयारी सुरू झालेली आहे. जमिनीची मशागत करून हळदीची लागवड करण्यासंदर्भात काम अंतिम टप्प्यात असल्याचे विभागीय कृषी अधिकारी श्री विश्वनाथ गावस यांनी यावेळी स्पष्ट केले .यामुळे पुढील वषी सत्तरी तालुक्मयामध्ये मोठय़ा प्रमाणात हळद व आल्याचे लागवडीच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल होण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची मदत प्राप्त होणार आहे. स्थानिक त्याचबरोबर राष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आले व हळदिला प्रचंड प्रमाणात मागणी आहे .सध्यातरी बाजारपेठेमध्ये प्रतिभा व सेलम या जातीला अत्यंत मोठी मागणी आहे. यामुळे शेतकऱयांनी प्रामाणिक स्तरावर ही लागवड करून यशस्वी केल्यास त्यांना चांगल्या प्रकारचे आर्थिक प्राप्ती होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विभागीय कृषी कार्यालयाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वेळोवेळी सहकार्य करण्यात येणार आहे.
महादेव नाईक करणार 1 हेक्टरी आले लागवड–फोटो वापरणे.
खडकी 70 येथील माधव नाईक एक हेक्?टर क्षेत्रामध्ये आल्याची लागवड करणार आहेत. या संदर्भाची पूर्वतयारी सुरू झालेली आहे. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि
आपल्याकडील जमिनीमध्ये नाविन्यपूर्ण लागवड करण्याच्या दृष्टीकोनातून आपण वाळपई विभागीय कृषी कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद लाभला. विश्वनाथ गावस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अधिकाऱयांनी आपल्या जमिनीमध्ये भेट देऊन एकूण सविस्तरपणे पाहणी केली व आपल्याला आल्या लागवडीसाठी प्रोत्साहित केले. आपण आखाती देशांमध्ये कामाला होतो. मात्र यामुळे सध्या सदर ठिकाणी काम करणे जमत नसल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये अनेक पिकाच्या माध्यमातून सोने उगविण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. याची सुरुवात झाली असून निसर्गाने चांगल्या प्रकारची साथ दिल्यास मोठय़ा प्रमाणे आल्याची लागवड करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.