प्रतिनिधी / भोगावती
केंद्र शासनाच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात करवीर तालुक्यातील सर्व डाव्या पक्षाच्यावतीने किसान मोर्चाच्या सहभागातून हळदी ता. करवीर येथील चौकात गुरुवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनासह अन्य विरोधी पक्ष सहभागी झाले होते.
या आंदोलनात माजी आमदार संपतराव पवार पाटील, करवीर तालुका चिटणीस के बी पाटील, माजी जि प सदस्य बाबासाहेब देवकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.