नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात आरोग्यविषयक प्रथमच मोठय़ा प्रमाणात जागृती झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये विविध प्रकारची उत्पादने प्रतिकारशक्ती वाढविणारी निर्माण करण्यात भर दिला जात आहे. यात सध्या देशातील दूध उत्पादनात प्रसिद्ध असणारी अमूल डेअरीने हळद दूधानंतर हळदयुक्त आईस्क्रीम बाजारात सादर केले आहे. अमूलने हळद दुधासह तुलसी दूध व आलेयुक्त दूध बाजारात आणलेले आहे. ही उत्पादने कोरोना काळात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मोठी मदत करणारी असल्याचा दावा अमूलने केला आहे. यांच्या जोडीला आता हळद आईस्क्रीम ही बाजारात आणले असून याचे 125 एमएल पॅकेट 40 रुपयांना उपलब्ध होणार असल्याची माहिती अमूलने दिली आहे. यामध्ये हळद दूधासोबत काळी मिरी, खजूर, काजू आणि बदाम यांचे मिश्रण घालून स्वादिष्ट करुन देण्याचा आम्ही प्रयत्न केला असून हे आईस्क्रीम ग्राहकांच्या पसंतीस उतरणार असल्याचा विश्वास अमूलने व्यक्त केला आहे. सध्या लोकांना रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणारी उत्पादने हवी असून लोक त्याचा शोध बाजारात घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेचे आम्ही अमूलचे हळद दुधासोबत हळद आईस्क्रीम ग्राहकांच्यासाठी सादर केल्याची माहिती समुहाचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोढी यांनी दिली आहे.
Previous Articleअति तिथे माती
Next Article किती काळ टिकतो सॅनिटायझर?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.