पॅरीस
विमान उद्योगजगताला यंदावर्षी जागतिक स्तरावर सुमारे 84 अब्ज डॉलर रुपयांच्या नुकसानीला सामोरं जाऊ लागू शकतं, असा अंदाज आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना (आयएटीए) यांनी व्यक्त केलाय. कोरोनाच्या जागतिक थैमानामुळे असं होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनामुळे विमानसेवेला सर्वाधिक फटका बसला असल्याचे संघटनेने म्हटले आहे. यंदावर्षीचा हवाई उद्योगाचा महसूल 419 अब्ज डॉलरवर घसरणार आहे. मागच्या वर्षी हा महसूल 838 अब्ज डॉलरचा होता.