ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आज सकाळी मध्य भारतातील एका हवाई तळावरून लढाऊ प्रशिक्षण मोहिमेसाठी उड्डाण केलेले भारतीय हवाई दलाचे मिग-21 बायसन विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेत हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन ए. गुप्ता हुतात्मा झाले.
भारतीय हवाई दलाने ट्विट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत हवाई दलाने आपला ग्रुप कॅप्टन ए. गुप्ता गमावला आहे. दुःखाच्या काळात गुप्ता यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे हवाई दलाने म्हटले आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इंक्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.