प्रतिनिधी / बेळगाव
कॅम्प पोलीस स्थानकातील हवालदार ए. एन. तुक्कार यांना शुक्रवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या उपस्थितीत गृहमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते मुख्यमंत्री पदक बहाल करण्यात आले.बेंगळूर येथे पोलीस ध्वज दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कर्नाटकातील 115 अधिकारी व पोलिसांना मुख्यमंत्री पदक बहाल करण्यात आले.