ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
हवेत कोरोना विषाणूचे छोटे कणही जिवंत राहतात. त्यामुळे हवेतून कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याची भीती 32 देशांच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेलाही इशारा दिला आहे.
32 देशांच्या शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला लिहिलेल्या पत्रानुसार, हवेत कोरोना विषाणूचे कण जिवंत राहतात. ते कण हवेत तरंगत असल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. हवेत तरंगणाऱ्या विषाणूमुळे लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणू संदर्भात पुन्हा संशोधन करावे, अशी विनंती, या पत्रातून करण्यात आली आहे.
या शास्त्रज्ञांच्या दाव्यावर जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांचे हे पत्र सायन्टिफिक जर्नलमध्ये प्रकाशित होणार आहे.