हसन/प्रतिनिधी
कोविड -१९ लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर हासनमधील एका खाजगी रुग्णालयात कामकरणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचार्याचा शुक्रवारी मृत्यू झाला. सुरेश असे या व्यक्तीचे नाव आहे. तो ४४ वर्षांचा होता आणि त्याला कोविशील्ड लस देण्यात अली होती.
लस दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबातील व्यक्तींनी सुरेश यांना कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक समस्या नसल्याचे म्हंटले आहे. परंतु, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश यांनी माहितीनुसार सुरेशचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असा संशय आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
डॉ. सतीश यांनी आजवर जिल्ह्यात या लसीचा फारसा कोणावरही दुष्परिणाम झालेला नाही. त्या व्यक्तीचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त आहे आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला असेल. जलद कोविड चाचणीने हे सिद्ध केले की तो सार्स-कोव्ही २ विषाणूसाठी नकारात्मक आहे.