प्रतिनिधी /पेडणे
हसापूर- पेडणे येथील श्री सातेरी ब्राह्मणी देवीच्या 16व्या वर्धापनदिन सोहळय़ानिमित्त शनिवार 12 रोजी रात्री 9.30 वा. प्रसिद्ध नाटककार वसंत कामत लिखित रहस्यमय नाटक ‘हॅन्ड्स अप’ येथील सातेरी प्रांगणातील भव्य रंगमचावर सादर होईल,
‘सातेरी कलामंदिर हसापूर’ यांची निर्मिती असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन गोविंद नाईक यानी केले असून पार्श्वसंगीत जवाहर बर्वे यांचे आहे, तर ध्वनिसंकलन प्रवीण चारी यांचे आहे. नेपथ्य चंद्रशेखर बर्वे व प्रकाशयोजना गौरव बर्वे यांची असून वेशभूषा श्रुती देसाई ,रंगभूषा साजरो शेटगावकर यांची आहे .
यात गोविंद नाईक, अरविंद नाईक, प्रजय मळीक, सुहास रा.मळीक, श्रुती देसाई, अंकिता गवस, नीलेश नारायण नाईक यांच्या भूमिका आहेत.