खानापूर
खानापुर तालुक्यातील हडलगा येथील रहिवासी सध्या राहणार विद्यानगर खानापूर येथील जवान परसराम सहदेव गुरव याचा राजस्थान मधील जयसलमर येथे मृत्यू झाला.
भारतीय सेनेत सेवा बजावत असताना गंभीर आजाराने त्याला ग्रासले होते. त्याला ब्रेन ट्यूमर झाल्याने तेथेच उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु त्याच्यावर उपचार झाला नसल्याने सदर जवान हुतात्मा झाला आहे.
त्याचा मृतदेह सोमवारी रात्री खानापूर ला आणण्यात आला व रात्री दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हुतात्मा जवान परसराम गुरव 2002 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाला होता गेल्या पंधरा वर्षात त्याने अनेक भागात सेवा बजावून सेवानिवृत्तीच्या वाटेवर होता. तसा त्याचा सेवेचा काळ संपुष्टात आला होता. त्याने आपल्या सेवेचा आणखी सहा महिने कालावधी वाढऊन घेतल्याने काही दिवसातच तो निवृत्त होऊन गावी परतणार होता, परंतु तेवढ्यातच त्याला ब्रेन ट्यूमर च्या आजाराने ग्रासल्याने उपचाराअभावी जवान हुतात्मा झाला आहे.
सोमवारी रात्री दहा वाजता खानापूर येथे लष्करी इतमामात मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्याच्या पश्चात आई पत्नी दोन मुले दोन भाऊ असा परिवार आहे. त्याच्या आकस्मित निधनामुळे खानापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.