वार्ताहर / चंदूर
कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे आज ९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वी शाहूनगर ९ नंबर गल्ली येथे १ व्यक्ती पॉझिटिव्ह आला होता. आज त्याच्या घरातील ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्याचबरोबर शाहूनगर विविध भागातील ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याची गावातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून कार्यरत झाली आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीमध्ये एका ११ वर्षीय व ७ वर्षाच्या मुलाचा, ३५ वर्षे व ६० वर्षाच्या दोन महिलांचा व इतर ५ पुरुष असून त्यातील ७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. बाधित व्यक्तीमध्ये एक बँक कॅशियरही असल्याचे समजते. आतापर्यंत चंदूरातील रुग्णांचा आकडा १२ वर गेला आहे.