प्रतिनिधी / हातकणंगले
हातकणंगले तालुक्यात मोसमी पाऊस गेल्या काही दिवसापासून सक्रिय झाला असून आज गुरुवार पर्यंत 93 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सरासरी ११.६३ टक्के पावसाची नोंद झाली आहे या मोसमी पावसामुळे तालुक्यातील बहुतांश ठिकाणी पेरणीचे काम पूर्णत्वाला गेले आहेत तर काही ठिकाणी अजूनही अंतिम टप्प्यात पेरण्या सुरू आहेत यात प्रामुख्याने तालुक्यांमध्ये सोयाबीन, भुईमूग, भात ,इत्यादी प्रमुख्याने पिके घेतली जातात.
तालुक्यात जरी पावसाचे प्रमाण सरासरी इतके असले तरी नद्यांचा उगम क्षेत्रात मोठ्या प्रमात पावूस सुरू असलेल्या ने हातकणंगले तालुक्यातून जाणाऱ्या वारणा व पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढ झाली आहे.