प्रतिनीधी / हातकणंगले
हातकणंगले पोलीस ठाण्यापासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या पेठा विभाग येथील साई कॉलनीत अज्ञातांनी चोरट्यांनी बंद तीन घरात चोरी केल्याची घटना उघडकीस आली. हातकणंगले पेठा विभाग येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेसमोर साई कॉलनी आहे. तेथील आप्पासाहेब उळागड्डे, प्रशांत कोळी, व शानुर शिकलगार राहतात घरात कोणी ही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तिघांच्या घराचे कडी कोयंडे कापून घरात प्रवेश करत चोरी केल्याचे निदर्शनास आले. यात आप्पसो उळागड्डे यांच्या घरी ७, २५० रु, प्रशांत कोळी यांच्या घरी ३ooo रु अशी एकूण १०, २५० रुपयांची रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. तसेच चोरांनी घरातील बॅग, पर्स शेजारील केळीच्या बागेत जावून टाकण्यात आल्या होत्या.
हातकणंगले पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या साई कॉलनीत चोरी झाल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेची फीर्याद आप्पासो उळागड्डे यांनी हातकणंगले पोलीसात दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
शिकलगार यांच्या घरात चोरांनी प्रवेश केला होता प्रथम दर्शन घरातील गॅसटाकी व चांदीचा काही ऐवज चोरीला गेला असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र महिला वर्गाने हा चांदीचा ऐवज दुसऱ्या ठिकाणी ठेवला होता व गॅस टाकी एका बाजूला ठेवली होती. ही दोन्ही साहित्य आढळून आल्यानंतर या घरातील काही चोरीत गेले नसल्याचे निदर्शनास आले.