प्रतिनिधी/हातकणंगले
हातकलंगलेमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात 30 जण आले होते. यामुळे या 30 जणांच्या अहवालाकडे प्रशासनासह नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर या 30 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्य़ाने हातकणंगलेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बुधवारी, सायंकाळी मध्य प्रदेशातून आलेल्या एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. यानंतर प्रशासनाने तात्काळ हा व्यक्ती ज्या ठिकाणी भाड्याने राहत होता तो सर्व परिसर सील करून त्याच्या संपर्कात आलेल्या तीस जणांचे स्वॅब घेले होते. या तीस जणांच्यारिपोर्टकडे संपूर्ण नगरपंचायतीचे लक्ष लागून राहिले होते. आज सायंकाळी या सर्वाचे अहवाल निगेटिव्ह आल्याची बातमी मिळताच नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
यानंतर नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांनी, जर कोणी आपल्या मित्रपरिवारात बाहेरून आले असेल तर त्याची तात्काळ कल्पना नगरपंचायतीला द्यावी व सहकार्य करावे तसेच कोणाला काही अपरिहार्य आढळून आलेत त्याची कल्पना द्यावी असे जनतेला आवाहन केले. तर जनतेने घाबरून न जाता धाडसाने सामोरे जावे असेही त्या म्हणाल्या.