वार्ताहर / चंदुर
प्रशासकाच्या नियुक्तीबाबत न्यायालयीन निर्णय लांबल्याने अखेर हातकलंगले तालुक्यातील कालावधी 6 तारखेला संपलेल्या ग्रामपंचायतींवर शासकीय व्यक्तींची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. हातकणंगले तालुक्यातील 19 गावांवर 16 जणांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये कृषी विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, शिक्षण विभाग विस्तार अधिकारी इ. विभागातील व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे प्रशासक होण्याचे राजकीय व्यक्तींचे स्वप्न भंगले आहे. त्यांना आता न्यायालयीन निकालाची वाट पहावी लागणार आहे. तालुक्यातील प्रशासक निवडीच्या राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. अनेकांच्या आग्रही मागणीमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. याबाबत आत्ता प्रशासक नियुक्तीची पुढील सुनावणी 7 तारखेला असून त्यानंतरचे निर्णय हे निकालावर अवलंबून असतील असे दिसते.
ग्रामपंचायती नुसार प्रशासन
दुर्गेवाडी – जी डी कदम
वाठार तर्फे वडगाव,कबनुर – एस जे पवार
खोची – विलास मारुती पाटील
बिरदेव वाडी – व्ही. व्ही. धुमाळ
कुंभोज – ए. एस. दबडे
नेज – पी. के. आलाटकर
हलोंडी – शुभांगी कावेकर
जंगमवाडी – नम्रता गुरसाळे
चंदुर ,रुई – एन. आर. रामांना
माणगाव – जितेंद्र वसगडेकर
माणगाववाडी – अजय कुमार बिरणगे
लाटवडे,मिणचे – सर्जेराव शिंदे
तासगाव – अर्चना मोरे
किणी – रवींद्र ठोकळ
मनपाडळे – एस. के. कांबळे
पाडळी – एन. पी. शिंदे