सर्वात छोटय़ा कारमधून ब्रिटन भ्रमंती
अजब विक्रम प्रस्थापित करण्यासाठी लोक काहीही करू शकतात. छंद माणसाला जगण्यासाठी नवी ऊर्जा देतो. लोकांना मोठमोठय़ा कार्सचा छंद असतो. ब्रिटनमध्ये राहणाऱया 31 वर्षीय ऍलेक्सने जगातील सर्वात छोटय़ा कारद्वारे अत्यंत मोठे काम केले आहे. ही कार अत्यंत छोटी असल्याने ती हातानेही उचलता येते.
या कारद्वारे ऍलेक्सने ब्रिटनच्या एका टोकापासून दुसऱया टोकापर्यंत प्रवास केला आहे. या पूर्ण प्रवासात ऍलेक्सच्या कारचा कमाल वेग 23 मैल प्रतितास इतका होता. हा प्रवास त्याने 13 नोव्हेंबर रोजी सुरू केला होता. 3 आठवडय़ांनी त्याचा हा प्रवास संपुष्टात आला आहे. रस्त्यावर या स्वतःच्या छोटय़ा कारमधून प्रवास करताना सर्व लोक त्यांच्याकडे पाहत होते.
1962 मधील मॉडेल
ऍलेक्सने ज्या कारमधून हा प्रवास पूर्ण केला ते पील पी50 मॉडेल आहे. ही कार 1962 मध्ये निर्माण केली जात होती. या कारमध्ये केवळ एकच दरवाजा आहे. 1962-65 पर्यंत या मॉडेलच्या कारची निर्मिती करण्यातत आली होती. त्यानंतर त्याचे उत्पादन रोखण्यात आले होते.
हाताने खेचता येणारी कार
ऍलेक्सचा हा प्रवास 1400 मैलांचा होता. अत्यंत छोटय़ा कारमधून प्रवास करणे एकप्रकारे आव्हानच होते. ऍलेक्स स्वतः 5 फूट 11 उंचीचा आहे. ही कार केवळ 137 सेंटीमीटर लांब आणि 99 सेंटीमीटर रुंदीची आहे. या कारचे वजन अत्यंत कमी असल्याने ती हातानेही उचलता येते. अत्यंत हलक्या कारला त्यांनी वादळात देखील चालविले आहे. 14 तासांत पूर्ण करता येणारा प्रवास त्यांनी 3 आठवडय़ांमध्ये पूर्ण केला आहे.