मोरजी / प्रतिनिधी
पेडणे तालुक्मयात तथा गोव्यात साच्यातून गणेश मूर्ती साकारणारे अनेक मूर्तिकार गावागावात आहेत त्यात पेडणे तालुक्मयात तर अनेक पारंपारिक मूर्तिकार आपल्या दृस्तीस पडतात .मोरजी गावामध्ये असे अनेक कलाकार आहेत जे पारंपारिक रित्या अनेक गणेश मुर्त्या तयार करतात अशाच प्रकारचे एक पारंपारिक मुर्त्या तयार करणारे नारोजी वाडा मोरजी येथील नारोजी कुटुंबीय ज्यांच्या चित्र शाळेला शेकडो वर्षाची परंपरा आहे स्व..विष्णू वाडजी हयात असे पर्यंत ही चित्र शाळा अखंडीत पणे चालू होती साधारपणे 200-250 गणेश मुर्त्या ते साकारत होते त्याकामी त्यांना घरातील सर्वजण मदत करायचे त्यात प्रामुख्याने त्यांचे मुलगे विठ्ठल आणि ज्ञानेश्वर यांचा समावेश होता मात्र अलीकडे कामाचा व्याप वाढल्याने तसेच व्यवसायामुळे म्हापसा ,पणजी याठिकाणी वास्तव्य करावे लागल्याने चित्रशाळा बंद करावी लागली तसेच कोविड -19 मुळे यावषी त्यांना घरी येणे शक्मय न झाल्याने वाडय़ावरील दोनचार मुर्त्या ते तयार करीत होते त्याही करणे शक्मय झाले नाही .मात्र त्यांनी आपल्या घरातला गणपती स्वतः तयार करण्याची परंपरा चालू ठेवली आहे .आणि ही मूर्ती तयार करताना कोणत्याही प्रकारचा साचा त्यांनी वापरलेला नाही हे विशेष .स्वतः फाईन आरटीस्ट असलेल्या श्री ज्ञानेश्वर विष्णू वाडजी यांचा पणजीत स्वताचा व्यवसाय आहे आणि व्हाईट निग्रो या नावाने जाहिरात तसेच इतर क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री वाडजी यांनी सुट्टीच्या दिवसाचा उपयोग करून स्वतःच्या हाताने श्री गणेश मूर्ती साकारली आहे .गेला महिनाभर ते या मूर्तीवर राबत आहेत सुट्टीचा उपयोग त्यांनी ही सुबक सुंदर गणेश मूर्ती साकारण्यात खर्च केले आहेत सध्या या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले असून रंगकाम हाती घेतले आहे आपल्या घरातील ही परंपरा सांभाळत असताना त्यांनी आजही आपल्या दैनंदिन व्यापातून वेळ काढून साकारलेली ही गणेश मूर्ती म्हणजे हस्त कलेचा एक सुदर आविष्कारच आहे असे म्हणावे लागेल