प्रतिनिधी / सांगली
भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सांगली वतीने सांगलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हातरस मागासवर्गीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध जोरदार निदर्शने करण्यात आली. या निदर्शनाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. हाथरस येथील तरुण मुलीवर बलात्कार करून तिची जीभ कापून बळी घेण्यात आला आहे. अशा आरोपींना पाठीशी घालण्यास जबाबदार असणारे योगी सरकार बरखास्त करा! अशी निदर्शनांमध्ये घोषणा देऊन जोरदार मागणी करण्यात आली.
या आंदोलनामध्ये कॉ विजय बचाटे कॉ. पुंडलिक कुंडले, कॉ. वर्षा गडचे, कॉ. मीनाक्षी कांबळे, कॉ. तानाजी जाधव, कॉ. सिराज शेख कॉ. शोकत मुजावर, कॉ रोहिणी कांबळे कॉ शितल मगदूम आदी उपस्थित होते.