ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
‘जमात-उद-दावा’ संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईतील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला अवैध टेरर फंडिंग प्रकरणी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
सईद लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आहे. 2001 साली अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने या संघटनेला दहशतवादी जाहीर केले. दरम्यान, 2002 मध्ये पाकिस्तान सरकारने या संघटनेवर बंदी घातल्यानंतर सईदने जमात-उद-दावाची स्थापना केली. त्याच्यावर टेरर फंडिंग (दहशतवाद्यांना पैसे पुरवणे), मनी लाँडरिंग आणि मालमत्तांचे अवैध ताबे घेतल्याप्रकरणी 41 गुन्हे दाखल आहेत.
हाफिज हा मुंबई 26/11 हल्ल्याचा सूत्रधार असून, या प्रकणात सईदचे साथीदार जफर इक्बाल आणि याह्या मुजाहिद यांना प्रत्येकी पाच वर्षे आणि आणखी एका प्रकरणात प्रत्येकी 6 महिन्यांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे.