ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक, जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद याच्यासह त्याच्या पाच साथीदारांची बँक खाती पाकिस्तान सरकारने सुरू केली आहेत.
कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी गोठवलेली बँक खाती सुरू करण्यासाठी हाफिज सईदसह जमात-उद-दावाच्या अब्दुल सलाम भुट्टावी, हाजी एम अशर्रफ, याह्या मुजाहिद आणि जफर इक्बाल यांनी आम्ही संयुक्त राष्ट्राकडे अपील केले होते. या सर्वांना संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेले आहे.
या पाच दहशतवाद्यांनी संयुक्त राष्ट्राकडे अपील केल्यानंतर त्यांचे उत्पन्न आणि आर्थिक स्रोतांबाबत पाकिस्तान सरकारने संयुक्त राष्ट्राला माहिती दिली. त्यांच्या बँक खात्याचे क्रमांक अन्य तपशिलासह देण्यात आले. त्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीने या पाच बँक खाती सुरू करण्यास मंजुरी दिली.