क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
खास मकर संक्रांतीनिमीत्त आयोजित हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत विजेत्या अयोयो स्पोर्ट कडोली संघाला रोख रक्कम 21,000 व चषक तसेच उपविजेत्या एंटान स्पोर्ट्स बेळगुंदी संघाला रोख रक्कम 12,000 व चषक प्रदान करुन गौरवण्यात आले. 65 संघानी सहभाग घेतला.
बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अरविंद पाटील तसेच पुंडलीक नाकाडी, कृष्णकांत बिर्जे, रामचंद्र नाकाडी, रवळू गुरव, विद्याधर गोवेकर, अशोक नाकाडी, दामोदर नाकाडी, गुंडू नाकाडी, पवण शेट्टी, दिनकर मरगाळे, सौरभ सावंत तसेच मंडळाचे कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
माजी आमदार अरविंद पाटील ,पुंडलिक नाकाडी, कृष्णकांत बिर्जे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अजित नाकाडी यांनी करुन मान्यवर मंडळी, सर्व देणगीदार तसेच स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी ज्यांनी असे सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले. आयोजन समितीने स्पर्धेच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.