नामांकन मिळवणारी जगातील पहिली कंपनी : असिस्टंट जनरल मॅनेजर माणिक रेड्डी पाटील यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
हायड्रोपॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला युनिफी (UNIFE) या कंपनीकडून आंतरराष्ट्रीय रेल्वे इंडस्ट्रीज स्टँडर्ड (आईरीस) हे नामांकन मिळाले असून वेहिकल फिटिंग आऊट आणि स्पेशल प्रोसेस वर्क या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळवणारी ही भारतातीलच नव्हे तर जगातील पहिली व एकमेव कंपनी आहे. अशी माहिती डीक्मयुएस कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर माणिक रेड्डी पाटील यांनी दिली.
उद्यमबाग येथील सुधीर दरेकर व श्रीनिवास हुद्दार संचलित हायड्रोपॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आईरीस या नामांकन करणाऱया जगदविख्यात डीक्मयुएस जर्मन कंपनीकडून नामांकन मिळाले असून हे नामांकनपत्र सुपूर्द करण्याचा कार्यक्रम मंगळवारी हायड्रोपॅकमध्ये झाला. त्याप्रसंगी माणिकरेड्डी पाटील म्हणाले, आईरीसच्या गाईडलाईन्स रेल्वे बनवणाऱया जगातल्या मोठय़ा कंपन्या जसे की बोंबारडियर, अल्स्टोम, वोईथ, फायव्हेली, सिमेन्स, नोर-बी आर. ई. एम. एस. ई एकत्रित येऊन हे स्टँडर्ड बनविले आहे. त्यामुळे ज्या कंपनीकडे हा स्टँडर्ड आहे त्या कंपनीचा प्रॉडक्ट हा वर्ल्ड क्लास स्टँडर्ड मानला जातो.
आजपर्यंत आईरीस हे नामांकन जगभरातील 2200 कंपन्यांना मिळालेले आहे. त्यामध्ये 800 चायनीज कंपन्यांना, 300 युरोपीयन कंपन्यांना व 60 भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. हायड्रोपॅक रोलिंग स्टॉकसाठी लागणारी इक्विपमेंट्स बनविते आणि त्यातल्या स्पेशल इक्विपमेंट्ससाठी हे नामांकन मिळवणारी ही पहिलीच कंपनी आहे. हायड्रोपॅक कंपनी बाहेरच्या उत्पादकांबरोबर कॉम्पेटिशन करुन जगभरातील ऑर्डर्स मिळवेल. प्रारंभी हायड्रोपॅकचे कार्यकारी संचालक सुधीर दरेकर यांनी कंपनीच्या कार्याच्या वाटचालीचा आढावा घेतला. 1989 मध्ये विविध ठिकाणी लागणारे हायड्रोलिक इक्विपमेंट्स परदेशातून आयात करावी लागत होती. ती तयार करण्याचे मी व श्रीनिवास हुद्दार यांनी ठरवले आणि त्यादृष्टीने काम केल्यानंतर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि सहकाऱयांच्या सहकार्यामुळे कंपनीला एका वेगळय़ा उंचीवर नेता आले. प्रारंभी रस्तेबांधणीला लागणारी इक्विपमेंट्स बनवली. त्यानंतर रेल्वे, विमान यांना लागणारी बनवली. त्यातूनच प्रगती साधत आम्ही हे यश मिळवले आहे. यापुढे आमच्या मशीन्स जगभरात कोठेही पाठवता येतील एवढे आमचे स्टँडर्ड असून त्याचा आम्हाला विश्वास आहे. कंपनीचे टेक्निकल डायरेक्टर श्रीनिवास हुद्दार यांनी माणिकरेड्डी पाटील यांचे स्वागत केले. ऑपरेशन्स डायरेक्टर अमित दरेकर यांनीही संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
याप्रसंगी माणिकरेड्डी पाटील यांच्या हस्ते हायड्रोपॅकच्या आईरीस टीमचे स्वागत करण्यात आले. उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांच्या हस्ते श्री दरेकर व हुद्दार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी कंपनीचा कर्मचारीवर्ग, हितचिंतक उपस्थित होते.