बेळगाव : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक, नागपूर यांचा दहावा दीक्षांत समारंभ बुधवार दि. 5 जानेवारी रोजी रामटेक, नागपूर येथे संपन्न झाला. ‘सिनियर डिप्लोमा इन वैदिक स्टडीज’ या अभ्यासक्रमात वेदमूर्ती ज्ञानेश्वर आप्पाजी पाटील यांना प्रथम प्रयत्नात विश्वविद्यालयात प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक प्राप्त झाले.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, इंडिक अकॅडमीचे संस्थापक श्रीहरिकिरण वड्मानि, गीता परिवार तथा वेदव्यास प्रति÷ानचे आध्यात्मिक धर्मगुरू गोविंद देवगिरीजी महाराज व विद्यापीठाच्या विविध विभागांचे विभागाध्यक्ष उपस्थित होते. विश्वविद्यालयाचे कुलगुरू व पूज्य गोविंददेवगिरी यांच्या हस्ते वेदमूर्ती ज्ञानेश्वर पाटील यांना सन्मानित करून सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
खानापूर तालुक्मयातील हारुरी येथे सामान्य कुटुंबात जन्मलेल्या वेदमूर्ती ज्ञानेश्वर यांनी संस्कृत, वेद, ज्योतिष, एम.फिल. इन संस्कृत, यजुर्वेद विशारद, डिप्लोमा इन वास्तुशास्त्र, डिप्लोमा इन योगशास्त्र, सिनियर डिप्लोमा इन वैदिक स्टडीज आदी पदव्या व पदविकेचे शिक्षण प्राप्त केले आहे. श्री दत्त पद्मनाभ पीठ श्रीक्षेत्र तपोभूमी गोवा पीठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांचा कृपाशीर्वाद व मार्गदर्शनानेच त्यांना ही विद्या आत्मसात करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. याचे श्रेय पूज्य ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींना देत प्राप्त कला-विद्या सद्गुरुचरणी समर्पित करीत असल्याचे वेदमूर्ती ज्ञानेश्वर पाटील यांनी मनोगतात म्हटले आहे.