ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक आणि क्रुणाल पांड्या यांचे वडील हिमांशु पांड्या यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बर्दाच्या वतीने सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी खेळणारा कॅप्टन क्रुणाल पांड्या बायो-बबलमधून बाहेर पडून घराकडे रवाना झाला आहे.
बडोदा क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर हट्टंगडी यांनी क्रुणाल पांड्याने बायो-बबल सोडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. हार्दिक आणि क्रुणालच्या या दुःखात बडोदा क्रिकेट असोसिएशन सहभागी असल्याचे हट्टंगडी यांनी म्हटले आहे.