वृत्तसंस्था/ नवी मुंबई
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंडय़ा आयपीएलमध्ये सर्वात जलद षटकारांचे शतक पूर्ण करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. सोमवारी येथील डीवाय पाटील स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने हा विक्रम नोंदवला.
या अष्टपैलूने एकूण 1046 चेंडू खेळत हा माईलस्टोन गाठला. याशिवाय त्याने शंभर षटकार नोंदवणारा जगातील तिसरा वेगवान ‘शतकवीर’ होण्याचा मानही मिळविला. याआधी विंडीजच्या ख्रिस गेल व आंद्रे रसेल यांनी हा पराक्रम केला आहे. सोमवारच्या सामन्यात गुजरातची तीन सामन्यांची विजयी घोडदौड सनरायजर्सने रोखताना 8 गडय़ांनी विजय मिळविला. गुजरातचा हा पहिला पराभव होता.