रोम : बोरूसिया डॉर्टमंड फुटबॉल संघातील हुकमी स्ट्रायकर तसेच नॉर्वेचा फुटबॉलपटू इर्लिंग हालँडने 2020 चा गोल्डन बॉय पुरस्कार पटकाविला. बुंदेस्लिगा फुटबॉल स्पर्धेत खेळताना हालँडने दर्जेदार कामगिरी केली होती.
2020 च्या गोल्डन बॉय पुरस्कार शर्यतीमध्ये हालँड तसेच बार्सिलोना संघातील फेती तसेच बायर्न म्युनिच संघातील डेव्हिस यांच्यात चुरस निर्माण झाली होती. 21 वर्षाखालील वयोगटाचे फुटबॉलपटूकरिता हा पुरस्कार देण्यात येतो. नॉर्वेच्या हालँडने गेल्यावर्षी विविध फुटबॉल स्पर्धामध्ये 44 गोल नोंदविले आहेत. 20 वर्षीय हालँडने चालूवर्षीच्या फुटबॉल हंगामात 11 सामन्यात 11 गोल नोंदविले. गेल्यावर्षी हा पुरस्कार ऍटलेटिको माद्रीदच्या फेलिक्सने पटकाविला होता.