प्रतिनिधी/ बेळगाव
रयत संघटनेच्यावतीने हालगा – मच्छे बायपासवर चर्चा करण्यासाठी सोमवार दि. 7 रोजी शेतकऱयांची बैठक बोलविण्यात आली आहे. रात्री 8 वा. ज्ञानेश्वर मंदिर, वाडा कंपाऊंड, वडगाव येथे ही बैठक होणार आहे. वडगाव, शहापूर, अनगोळ, मच्छे, जुनेबेळगाव, हालगा व इतर भागातील शेतकऱयांना बायपासच्या दाव्याबद्दल माहिती देण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱयांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव शहर रयत संघटनेचे अध्यक्ष हणमंत बाळेकुंद्री यांनी केले आहे.