कलश मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग
वार्ताहर/ किणये
हालगा येथील मरगाईदेवी मंदिराचा लोकार्पण सोहळा रविवार दि. 17 रोजी आयोजित करण्यात आला आहे. गावातील जागृत मरगाईदेवीच्या मंदिराचे लोकार्पण होणार असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मरगाई मूर्ती धान्य व पाण्यात ठेवण्यासाठी गावात कलश मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत डोक्मयावर कलश घेऊन महिला मोठय़ा प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. मंदिर उद्घाटनासाठी भव्य असा शामियाना उभारण्यात आला आहे.
शुक्रवारी मरगाई मूर्ती पाण्यात ठेवण्यात आली. तसेच शनिवारी तीच मूर्ती धान्यामध्ये ठेवण्यात आली. गावात मरगाई मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. सुंदर असे मंदिर ग्रामस्थांच्या एकीतून बांधण्यात आलेले आहे.
देवी जागृत असल्याने हालगा गावासह पंचक्रोशीतील भाविकांची मंदिराच्या उद्घाटन सोहळय़ाला मोठी गर्दी होणार आहे.
रविवारी सकाळी 9.15 ते सकाळी 11 पर्यंत मरगाईदेवीच्या मंदिराची वास्तुशांती, त्यानंतर मूर्ती प्रति÷ापना होईल. रुद्राभिषेक, होमहवन, नवग्रह पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर कळसारोहण करण्यात येणार आहे. सर्व धार्मिक विधी व कार्यक्रम केदार पीठ शाखा मुत्नाळ मठाचे प. पू. श्री शिवानंद शिवाचार्य स्वामीजी यांच्या मार्गदर्शनानुसार होणार आहेत.
मंदिर जीर्णोद्धार कमिटी, पंचमंडळी आदी गेल्या पंधरा दिवसांपासून लोकार्पण सोहळय़ाची तयारी करीत आहेत. प्रमुख पाहुणे मंडळी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. वैयक्तिक घरगुती पै-पाहुणे व मित्रमंडळींनासुद्धा नागरिकांना आमंत्रण दिलेले आहे.
उद्घाटन सोहळय़ानिमित्त भव्य असा शामियाना उभारण्यात आला आहे. शामियान्याच्या प्रवेशद्वारावर मारुतीरायाची मूर्ती बसविण्यात आली आहे. गावात ठिकठिकाणी स्वागत कमानी व भगवे ध्वज लावण्यात आले आहेत.
दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे. सोमवार दि. 18 व मंगळवार दि. 19 असे दोन दिवस देवीची ओटी भरण्यात येणार आहे. या सोहळय़ाला गावातील सर्व जाती-धर्माचे लोक उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा कोरोना नियमावलींचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे ग्रामस्थांच्यावतीने कळविण्यात आले आहे..