मूळापासून कापला होता वृक्ष – दुसऱया वृक्षाने मरू दिले नाही
सोशल मीडियावर एक चकित करणारे छायाचित्र व्हायरल होत असून ते पाहून माणसाने निसर्गापासून शिकण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे. हा निसर्गाचा चमत्कार असल्याचे अनेकांनी नमूद केले आहे. या छायाचित्रात दोन वृत्त दिसून येतात. एक झाड मोठे तर दुसरे छोटे आहे. पण छोटय़ा झाडाला मूळापासून वेगळे करण्यात आले आहे. तरीही ते झाडे जिवंत असून हिरवाईने बागडलेले आहे. दुसऱया झाडाने त्याला मरू दिलेले नाही.
रिबेका नावाच्या व्यक्तीने हे छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. कमी आकाराचा बुंधा असलेल्या झाडाला कित्येक वर्षांपूर्वी तोडण्यात आले होता. तेव्हापासून मोठय़ा आकाराचे खोडे असलेले झाड त्याला सावरून आहे, त्याला जगवत असल्याचे रिबेकाने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
हे छायाचित्र इंटरनेटवर व्हायरल झाले असून आतापर्यंत 97 हजारांहून अधिक लाइक्स आणि 17 हजारांहून अधिक रीट्विट मिळाले आहेत. तसेच हजारो युजर्सने यावर प्रतिक्रिया दिली आहे.