गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी नॉन स्ट्रायकर एण्डवरील फलंदाज क्रीझ सोडत असेल तर त्याला बाद करण्याची नियमबुकात नोंद आहे. पण, या पद्धतीला मंकडिग असे ओळखले जाणे हा महान फलंदाज, दिवंगत विनू मंकड यांचा अपमान आहे, असे गावसकर याप्रसंगी म्हणतात. मंकड यांनी 1948 मध्ये नॉन स्ट्रायकर एण्ड सोडणाऱया बिल ब्राऊनला बाद केले होते. त्यामुळे, अशा रितीने बाद करण्याच्या पद्धतीला मंकडिग असे संबोधले जाते. गावसकर यांनी मात्र यावर सातत्याने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
तत्कालीन ऑस्ट्रेलियन कर्णधार सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी त्यावेळी मंकड योग्य असल्याचे म्हटले होते. नियमबुकात नोंद आहे, त्याचप्रमाणे मंकड यांनी ब्राऊनला बाद केले आहे, असे ब्रॅडमन त्यावेळी म्हणाले होते.
दरम्यान, नॉन स्ट्रायकर एण्डवर क्रीझ सोडून बाहेर जाणाऱया ऍरॉन फिंचला फक्त ताकीद दिल्याबद्दल अश्विनचे गावसकर यांनी कौतुक केले. ‘अश्विन प्रगल्भ क्रिकेटपटूंपैकी एक आहे. फिंचला फक्त ताकीद देऊन त्याने आपले प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्याप्रती आदर दर्शवला. पण, याचवेळी ही पहिली आणि शेवटची ताकीद असल्याचेही तो म्हणाला. त्यामुळे, यापुढे कोणी असा प्रकार केला तर अश्विन त्याला बाद करण्यास सज्ज असेल’, याचा सनी यांनी शेवटी उल्लेख केला.