एपीएमसी पोलीस स्थानकात घटनेची नोंद
प्रतिनिधी/ बेळगाव
दरोडा व खून प्रकरणी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱया शिरगुप्पी (ता. अथणी) येथील एका कैद्याचा रविवारी आजाराने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
शंकर यमनाप्पा बजंत्री (वय 58, रा. शिरगुप्पी, ता. अथणी) असे त्याचे नाव आहे. 17 मे रोजी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला आहे. अथणी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 10 वर्षांपूर्वी घडलेल्या दरोडा व खून प्रकरणी त्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. 27 फेब्रुवारी 2010 पासून त्याला हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते. आजारामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.