हिंडलगा : हिंडलगा ग्राम पंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीचे प्रोसिडिंग बंद करण्याच्या मागणीसाठी मंगळवार दि. 6 रोजी ग्राम पंचायत सदस्यांच्यावतीने जिल्हा पंचायत व ग्राम पंचायत कार्यकारी अधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
सदस्यांनी तालुका पंचायत अधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या नियमानुसार कोणत्याही ग्राम पंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीचे प्रोसिडिंग सात दिवसांच्या आत बंद करणे जरुरीचे आहे. पण हिंडलगा ग्राम पंचायतमध्ये मात्र सर्वसाधारण सभा होऊन 45 दिवस उलटले तरीदेखील अद्यापही प्रोसिडिंग बंद करण्यात आलेले नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करून दि. 19 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या सभेचे प्रोसिडिंग त्वरित बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुदेमानीकर, राहुल उरणकर, विठ्ठल देसाई, प्रवीण पाटील, चेतना अगसगेकर, प्रेरणा मिरजकर, अलका कित्तूर, अशोक कांबळे, गजानन बांदेकर व इतर उपस्थित होते.