प्रतिनिधी / बेळगाव
ग्राम पंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तसेच निवडणुका घेण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावातील इच्छुक कार्यकर्ते व माजी सदस्य तयारीला लागले आहेत. निवडणूक लढविण्यासाठी हिंडलगा ग्रामस्थांच्यावतीने ग्राम विकास सुधारणा कमिटीची स्थापना करून पदाधिकाऱयांची निवड नुकतीच केली.
गावच्या विकासासाठी सदस्यांची निवड केली जाते. पण काही सदस्य केवळ स्वत:चा स्वार्थ पाहतात. त्यामुळे गावचा विकास खुंटला आहे. आगामी निवडणुकीत चांगल्या व कर्तबगार सदस्यांची निवड करण्याच्या दृष्टीने गावात बैठका घेण्यात आल्या. तसेच ग्राम विकास सुधारणा कमिटीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 101 सदस्यांची ग्राम विकास सुधारणा कमिटी स्थापन करण्यात आली आहे. रविवारी कमिटी सदस्यांची बैठक आयोजित करून पदाधिकाऱयांची निवड करण्यात आली.
यावेळी प्रारंभी माजी आमदार बी. आय. पाटील, खासदार सुरेश अंगडी, गावातील ज्ये÷ नागरिक फकिरा देवरमणी, कृष्णा गणाचारी, बसवंत अप्पुनी कडोलकर आणि युवा कार्यकर्ते परशराम पाखरे आदींचे आकस्मिक निधन झाल्याने कमिटीच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर कमिटीच्या अध्यक्षपदी व कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव अशा विविध पदांवर सदस्यांची निवड करण्याची माहिती देण्यात आली. अध्यक्षपदाची धुरा कृष्णा फकिरा पावशे व कार्याध्यक्षपद रमाकांत यादो पावशे यांच्याकडे देण्याची सूचना मांडण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून सुरेश नाईक, खजिनदारपदी प्रकाश कडोलकर यांची एकमताने निवड करून सचिवपदाची जबाबदारी प्रकाश बेळगुंदकर यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्राम विकास सुधारणा कमिटीच्या सदस्यांनी टाळय़ांच्या गजरात निवडीच्या ठरावाला मंजुरी दिली. तसेच आगामी निवडणुकीत कर्तबगार व गावच्या विकासासाठी झटणाऱया कार्यकर्त्यांची ग्राम पंचायत सदस्यपदी निवड करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच निवडणूक लढविण्यासाठी चर्चा करून अर्ज स्वीकारण्याबाबत मार्गसुची तयार करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱयांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले. यावेळी सदस्यांनी आपल्या सूचना मांडून पदाधिकाऱयांना शुभेच्छा दिल्या.