हिंडलगा : हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱया रस्ते डांबरीकरण व काँक्रिटीकरण कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मनोळकर होते. सदर रस्त्यांसाठी नागेश मनोळकर यांच्या प्रयत्नातून शासनामार्फत भरीव निधी मंजूर झाला आहे. त्यामधून विठ्ठल मंदिर रोड, हायस्कूल रोड, कलमेश्वरनगर, गोकुळनगर, श्रीनाथनगर आदी रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
याप्रसंगी ग्राम पंचायत उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर, सदस्य निर्मलकुमार धाडवे, मिथून उसुलकर, लता उसुलकर, ओमकार हळदणकर, लक्ष्मी परमेकर, आरती कडोलकर, नामदेव पाटील, संगीता पलंगे, रेणू गावडे, सुमन राजगोळकर, कॉन्ट्रक्टर गजानन अष्टेकर, नरेंद्र खांडेकर, रमेश कडोलकर, संतोष पिल्ले, प्रभाकर पुजारी, परशराम यळ्ळूरकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.