प्रतिनिधी / बेळगाव
लक्ष्मीनगर, समर्थ कॉलनी, हिंडलगा येथील दत्त मंदिराचा 13 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री मूर्तीला हिंडलगा ग्राम पंचायतचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. यावेळी यमुनाक्का भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.
दुपारी 12 वा. किरण स्वामी यांच्या हस्ते महाआरती पार पडली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष शेखर दळवी यांच्या हस्ते किरण स्वामी यांचा शाल व श्ऱीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री समर्थ महिला मंडळाच्या भगिनी व श्री समर्थ सांस्प़ृतिक मंडळाचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले. कार्यक्रमाला भक्तमंडळींनी उत्साहाने उपस्थिती दर्शविली.