क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा शरीरसौष्टव संघटना व हनुमान स्पोर्ट्स क्लब हिंडलगा आयोजित 10 व्या हिंडलगा श्री जिल्हास्तरीय, 10 हिंडलगा क्लासिक टॉप टेन, रूदा क्लासिक टॉप टेन स्पर्धेचे आयोजन, आज शनिवार दि. 9 एप्रिल रोजी हिंडलगा बॉक्साईट रोड आंबेवाडी क्रॉस येथे करण्यात आले आहे. हिंडलगा श्री स्पर्धा आयबीबीएफच्या नियमानुसार 50, 60, 65, 70, 75, 80 व 80 किलोवरील वजनी गटात घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या पाच स्पर्धकांना अनुक्रमे 3 हजार, 2 हजार, तीन, चार व पाचव्या क्रमांकाच्या स्पर्धकांना प्रत्येकी 1 हजार रूपये रोख, प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून गौरविण्यात येणार आहे. हिंडलगा श्री किताब विजेत्याला रोख 7 हजार रूपये, मानाचा किताब, चषक व प्रमाणपत्र तर उत्कृष्ट पोझरला 1 हजार रूपये रोख व चषक देण्यात येणार आहे. टॉप टेन स्पर्धकांना रोख रक्कम व चषक देवून गौरविण्यात येणार आहे. दुपारी 3 ते 5 या वेळेत स्पर्धकांची वजने घेतली जाणार आहेत तर सायंकाळी 5 वा. स्पर्धेला सुरूवात होणार आहे. अधिक माहितीसाठी नागेश माडिवाळ, सुनील राऊत, सचिन किल्लेकर यांच्याशी संपर्क साधावा.