वार्ताहर / हिंडलगा
बेळगाव तालुक्मयाच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्मयातील हिंडलगा ग्रामपंचायतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
हिंडलगा ग्रामपंचायत क्षेत्रात घरोघरी स्वॅब तपासणीच्या मोहीमेला आजपासून प्रारंभ करण्यात आला. तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आज घरोघरी जाऊन नागरिकांच्या घशातील द्राव गोळा करण्यासाठी व आवश्यक खबरदारी घेण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांनी गावातील प्रत्येक घराला भेट दिली.
यावेळी हिंडलगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष अध्यक्ष नागेश मन्नोळकर, उपाध्यक्ष भाग्यश्री कोकीतकर, सदस्य रामचंद्र मन्नोळकर, मिथुन उसूलकर, पीडीओ गंगाधर नाईक, यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.