वार्ताहर /हिंडलगा
सध्या सर्वत्र कोरोना महामारीचा हैदोस सुरू आहे. अशा स्थितीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच नागरिकांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी हिंडलगा ग्रा. पं. ने आपल्या विकासकामांचा धडाका सुरूच ठेवला आहे. त्यानुसार ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील वॉर्ड क्र. 4 मधील हायस्कूल रोड व गोकुळ नगरातील विविध ठिकाणचे रस्ते तसेच इतर विकासकामांचा आरडीपीनुसार फंडातून नुकताच शुभारंभ करण्यात आला.
ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांच्या प्रयत्नातून विकासकामांसाठी निधी मंजूर झाला असून वॉर्डचे सदस्य चंद्रकांत बांदिवडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्ता कामाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर, माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर, सदस्य मिथून उसुलकर, निर्मलकुमार धाडवे, लक्ष्मी परमेकर, लता उसुलकर, आरती कडोलकर, संगिता पलंगे, नितीनसिंग रजपूत, रेणू गावडे, सुमन राजगोळकर, मिनाक्षी हित्तलमनी, स्नेहल कोलेकर, ओमकार हळदणकर, सीमा देवकर, दुर्गाप्पा कांबळे, परशराम यळ्ळूरकर, बाळू कणबरकर, शुभम अगसगेकर, प्रसन्ना नाईक, ओमकार बांदिवडेकर, दीपक नाईक, मारुती कुरंगी यांच्यासह परिसरातील रहिवासी उपस्थित होते.