प्रतिनिधी / कोल्हापूर
येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांची सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भेट घेवून तब्येतीची विचारपूस केली. श्री. खंचनाळे यांच्या उपचारासाठी शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे सांगतानाच डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्यावतीने श्री. खंचनाळे यांच्या उपचारसाठी एक लाखाची मदत राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी खंचनाळे यांच्या चिरंजीवाकडे सुपूर्द केली.
यावेळी माजी आमदार सुजीत मिणचेकर, डायमंड हॉस्पिटलचे डॉ. साई प्रसाद, डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर आणि मंगेश चिवटे उपस्थित होते.