ग्राहकांना पोस्ट सेवा मिळणार तात्काळ
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राहकांना पोस्ट खात्याच्या सेवा तात्काळ मिळाव्यात यासाठी प्रँचायजी देण्यात येते. बेळगाव शहरासोबतच हिंदवाडी येथे नव्याने प्रँचायजी सुरू करण्यात येणार आहे. प्रँचायजी सुरू करण्याबाबत पोस्ट खात्याकडून परवानगी देण्यात आली असून सोमवार दि. 23 पासून त्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपलबध झाली आहे.
यापूर्वी वडगाव येथे एक प्रँचायजी सुरू करण्यात आली होती. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत गेल्यामुळे आता हिंदवाडी व बेळगाव शहरात प्रँचायजी सुरू करण्यात येणार आहे. हिंदवाडी येथे अनुश्री बंट तर शहर मुख्य भागासाठी चिदानंद पंडित यांना ही प्रँचायजी देण्यात आली आहे. याद्वारे स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट व स्टॅम्पची विक्री करण्यात येणार आहे.